fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

आता आंदोलने का होत नाहीत?`महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे!` असे महात्मा गांधी म्हणाले होते. कारण सामाजिक सुधारणांचे अनेक झरे महाराष्ट्रात जागोजागी फुटल्याचे  तेंव्हा दिसत होते. या झऱ्यांचा प्रवाह विस्तारुन त्याचे मोठ्या धारेत रुपांतर व्हायचे तर त्यासाठी नेतृत्वाच्या मागे येणारा कार्यकर्त्यांचा जथा लागतो. आंदोलने त्यातूनच जन्माला येतात. सामान्य माणसाच्या मनात साचलेले असमाधान, त्यासाठी रस्त्यावर येण्याची त्यांची तयारी आणि त्या तयारीला विधायक वळण देण्याचे सामर्थ्य असलेले नेतृत्व यातून आंदोलने होत असतात. आजच्या काळात आंदोलने होताना का दिसत नाहीत? या वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना अमर हबीब यांनी नेमके उत्तर दिले होते, २०१२ साली ‘अंतर्नाद’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या प्रस्तुत लेखात.

अमर हबीब हे मूळचे उत्तर प्रदेशचे. ते महाराष्ट्रात आले आणि अंबाजोगाई येथे स्थायिक झाले. शालेय शिक्षण घेत असताना ते राष्ट्र सेवा दलाकडे खेचले गेले. १९७४ ला मराठवाडय़ात झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात त्यांनी भाग घेतला. आणीबाणीचा निषेध केला. मिसाखाली १९ महिने तुरुंगवास भोगला. १९८० पासून ते शेतकरी आंदोलने करीत आहेत. गावोगाव भटकंती करून शेतकरी चळवळीचा विचार ते शेतकऱ्यांपर्यंत पोहचवतात. ‘भूमिसेवक’ हे साप्ताहिक त्यांनी काही काळ चालवले.

**********

ज्यांनी उभ्या हयातीत कधी आंदोलनात भाग घेतला नाही, तेच साळसूदपणे विचारतात, ‘हल्ली आंदोलने वगैरे काही दिसत नाहीत?’ बहुतेक नोकरी करणारे लोक असा प्रश्न विचारतात. चौकोनी संसार जपणारे हे कर्मचारी रोज सकाळी उठून कचेरीला जातात. उन्हाळा असो की पावसाळा, न चुकता कचेरीला जाणे अटळ असते, तसेच त्यांना आंदोलनाबद्दल वाटते. ‘जसा मी नोकरदार तसा हा आंदोलक’, असा त्यांचा सरळ समज असतो. ‘हल्ली आंदोलन वगैरे चळवळी दिसत नाहीत’ म्हणजे सध्या तुम्हांला काही काम नाही. म्हणजे तुम्ही बेकार आहात. तुमच्या कुटुंबाचे कसे भागते? अशी खोच या प्रश्नामागे असते. जे कधी आंदोलनात सहभागी झाले नाहीत व ज्यांनी कपड्यांची इस्त्री कधी मोडू दिली नाही, अशा चाकरमान्या लोकांचे प्रश्न फारसे गंभीरपणे घेऊ नयेत. आंदोलन चालू असताना यांनी साधे ढुंकून पाहिले नाही. उलट आंदोलकांची हेटाळणी केली. काही प्रसंगी विरोध केला. त्यांना आज अचानक कसा पाझर फुटला?

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 3 Comments

  1. अंतर्नाद अंकाच्या स्वरुपात लेख संग्रही आहेच पण एक छान लेख पुन्हा वाचनाचा आनंद दिला याबद्दल धन्यवाद.

  2. उत्तम

  3. छान लेख.

Leave a Reply

Close Menu