fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

कारागृहातील दिवस (ऑडीओसह)इंग्रजी साहित्यात ‘प्रिझन लिटरेचर’ नावाची एक संकल्पना आहे. ‘प्रिझन लिटरेटचर’ म्हणजे अर्थातच लेखक काही कारणाने तुरुंगात असताना त्याने लिहिलेले साहित्य अथवा तुरुंगातील अनुभवांविषयी केलेले लिखाण. तुरुंगात असताना माणूस अंतर्मुख होतो. जगाचा, समाजाचा, आयुष्याचा वेगऴ्या पद्धतीने विचार करु लागतो, त्यातून हे साहित्य जन्माला येते. उदाहरणार्थ मार्को पोलोने त्याच्या चीनमधील प्रवासाविषयी लिहिले ते जिनोव्हा येथील तुरुंगात. हिटलरने त्याचे ‘माइन काम्फ’ हे आत्मचरित्र लिहिले तेही तुरुंगातच. आपल्याकडेही अशी उदाहरणे आहेत. लोकमान्य टिळकांनी मंडाले येथील तुरुंगात लिहिलेले ‘गीतारहस्य’,  पंडित नेहरूंनी महाराष्ट्रातील अहमदनगर येथील तुरुंगात असताना लिहिलेला ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा भारताचा शोध घेणारा ग्रंथ, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी  कारागृहाच्या भिंतींवर उमटवलेले साहित्याचे शब्द.  दुसरा प्रकार असतो तो तुरूंगवास भोगून आल्यावर प्रसवलेल्या साहित्याचा, तेथील अनुभवाचे शब्दांकन करण्याचा. राजकीय कैद्यांना तुरुंगात तुलनेने अधिक मोकळेपणा असतो. सोबतचे कैदीही अनेकदा ओळखीचे असतात. त्यांचे वागणे, तुरुंगातील सततच्या सहवासातून कळलेले काही कंगोरे यावर नंतर केले गेलेले लिखाण त्यामुळेच खूप वेगळ्या प्रकारे केले जाते.  समाजवादी विचारवंत ग.प्र. प्रधान यांचा प्रस्तुत लेख हे अशाच प्रकारातले अतिशय मनोज्ञ असे लिखाण आहे.

गणेश प्रभाकर तथा ग.प्र. प्रधान ( २६ ऑगस्ट १९२२ ते २९ मे २०१० )  हे ज्येष्ठ समाजवादी विचारवंत म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. त्याचबरोबर प्राध्यापक, लेखक आणि राजकीय भाष्यकार म्हणूनही त्यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अवकाशात मूलभूत योगदान दिले आहे. १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीत आणि स्वातंत्र्योत्तर आणिबाणीच्या कालखंडात त्यांनी कारावास भोगला. प्रस्तुत ‘माझे विद्यापीठ’ या लेखात त्यांनी या कारावासातील अनुभव शब्दबद्ध केले आहेत. कठीण कालावधीत आलेले जीवनानुभव माणसाला आयुष्यभर पुरेल एवढी अनुभवांची शिदोरी देऊन जातात. बिकट परिस्थितीतून तावून सुलाखुन निघालेल्या माणसाच्या जीवनविषयक धारणा अधिक प्रखर होतात. कसोटीच्या प्रसंगाला सामोरे जात असताना विचारवंत म्हणून प्रख्यात असणाऱ्या व्यक्तींचा देखील कस लागतो. हीच बाब प्रधान यांनी या लेखातून ओघवत्या शैलीत मांडली आहे

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

Leave a Reply

Close Menu