मामोनी रायसम गोस्वामी

अंक : अंतर्नाद

तेहतीस वर्षांपूर्वी दिल्ली विश्वविद्यालयाच्या ‘आधुनिक भारतीय भाषाविभागा’तील अध्यापकवर्गात मी प्रविष्ट झालो तेव्हा देशभरातल्या विविध भागांमधून आलेले प्राध्यापक माझे सहकारी बनले. त्यावेळी असमिया, बांगला, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, सिंधी, तमिळ, तेलुगू आणि मणिपुरी अशा बारा भाषांचा त्या विभागात समावेश होता. या सगळ्या प्राध्यापकांमध्ये असमिया भाषेची त्यावेळी प्रपाठक असलेली इंदिरा गोस्वामी चटकन कुणाचेही लक्ष वेधून घेईल अशीच होती. अडतीस वर्षांची ही तरुण प्राध्यापिका भडक प्रसाधन करून विद्यापीठात यायची, अतिशय महाग साड्या नेसायची, आणि मुख्य म्हणजे सगळ्या प्राध्यापकांत तिची एकटीची गाडी होती. ड्रायव्हर होता. विभागाने आयोजित केलेल्या चर्चासत्रांमध्ये अथवा डिपार्टमेंटल कौन्सिलच्या बैठकींमध्ये ती फारशी बोलायची नाही; पण एवढ्या-तेवढ्या कारणाने खळखळून मधुर हास्य करायची आणि वातावरण उत्साहाने भारून टाकायची. चारपाच वर्षे, ‘एक आकर्षक व्यक्तिमत्वाची श्रीमंत सहकारी प्राध्यापिका’ यापलीकडे तिच्याविषयी मला जास्त काहीच माहिती नव्हती.

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has One Comment

  1. shripad

    अप्रतिम लेख!

Leave a Reply