वाचनसंस्कृती आणि शहामृग

पुनश्च    भानू काळे    2018-07-16 06:00:40   

अंक - अंतर्नाद -२०१२

दोन मोठ्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेले वाचनसंस्कृतीवरचे दोन लेख परवाच एकापाठोपाठ एक वाचनात आले. आपली वाचनसंस्कृती आजही अगदी ठणठणीत आहे, लोक मराठी पुस्तके वाचत नाहीत ही ओरड खोटी आहे, शहरी भागात कदाचित वाचनाचे प्रमाण कमी झाले असेल पण ग्रामीण भागात आजही भरपूर पुस्तके खपतात आणि मुख्य म्हणजे ग्रामीण तरुणही मोठ्या प्रमाणावर पुस्तके वाचत असतो असा साधारण त्या लेखांचा आशय होता. या अतिशय आशावादी, 'फील-गुड' विवेचनाला आधारभूत होती ती चंद्रपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या साहित्यसंमेलनात तीन कोटी रुपयांची पुस्तके विकली गेली, ही सगळीकडे ठळकपणे प्रसृत झालेली बातमी. कोणीही तिचे खंडण केले नव्हते व त्यामुळे ती खरी असावी असेच बहुतेकांनी मानणे स्वाभाविकही होते.

माझ्या मनात मात्र हा लेख वाचल्यावर काही प्रश्न निर्माण झाले. पहिला प्रश्न म्हणजे, विक्रीचा हा आकडा जरी खरा मानला, तरी तो खरोखरच जल्लोष करण्याजोगा आहे का? महाविद्यालयांची व ग्रंथालयांची संख्या, सुशिक्षितांचे वाढलेले प्रमाण, रुपयाचे घसरलेले मूल्य हे सारे विचारात घेता हा आकडा मोठा मानायचा का? दुसरा प्रश्न म्हणजे, छोटा असो वा मोठा, मुळात हा आकडा तरी कितपत खरा आहे? संमेलनात पुस्तकविक्रीचे सुमारे दोनशे स्टॉल्स होते. त्या सर्वांकडे जाऊन कोणी विक्रीची आकडेवारी गोळा केली होती का? कोणी तसा प्रयत्न केला तरी विक्रेते त्याला खरेखरे आकडे सांगतील का? स्वत:च्या पुस्तकाच्या किती प्रती विकल्या गेल्या याविषयी मराठी लेखक स्वतःदेखील खूपदा अंधारात असतो. या  संमेलनातील एकूण पुस्तकविक्रीविषयी ढोबळ अशीदेखील आकडेवारी गोळा करणे कितपत शक्य आहे? शिवाय, या खरेदीमध्ये धार्मिक पुस्तके, पाककृतींची पुस्तके, क्रमिक पुस् ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


अंतर्नाद , चिंतन

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.