इन्कम टॅक्स डे


अंक : नवनीत (वर्ष : ऑक्टो.१९७१)  प्राप्तीकर म्हटला की माणूस तो कसा टाळता येईल हे पाहत असतो. अर्थातच अमेरिकन माणूसही त्याला अपवाद नाही. इन्कम् टॅक्स कशा तर्‍हेने टाळता येईल, किमान कमी भरावा लागेल याकरता त्याची धडपड चालूच असते. पण हाच अमेरिकन नागरिक ‘इन्कम टॅक्स डे’ हा दिन मोठ्या उत्साहाने साजरा करीत असतो. अमेरिकेतील सर्व नागरिक मग ते कोणत्याही जातीचे, धर्माचे, वंशाचे असोत, हा दिन पाळतातच. ‘इन्कम् टॅक्स’च्या जनकाचा जन्म १५ एप्रिल १८४२ रोजी वॉशिंग्टन (डी.सी.) येथे झाला. श्री. व सौ. हिरम टॅक्स यांनी आपल्या पुत्राचे नाव मॅक्सवेल असे ठेवले होते. पण त्यांच्या कुटुंबात व मित्रमंडळीत तो मॅक्स टॅक्स या नावानेच ओळखला जाऊ लागला. मॅक्स अतिशय हुषार होता. तो शाळेत कसून अभ्यास करीत असे. आपण डॉक्टर व्हावे अशी त्याची महत्त्वाकांक्षा होती. पण त्याच्या वडिलांच्या मनात मुलाने अकांउटंट व्हावे अशी इच्छा होती. वडिलांचा शब्द प्रमाण मानण्याचे दिवस होते ते. म्हणून मॅक्सने तो अभ्यासक्रम पत्करला. वयाच्या एकविसाव्या वर्षी मॅक्स मान्यताप्राप्त अकांउटंट झाला. पण त्या काळात अकांउटंटनेच केले पाहिजे असे काम व्यापारी जगात फारसे उपलब्ध नव्हतेच. वॉशिंग्टनमध्ये कोणी काम द्यायला तयार नव्हते. तो कुठे काम मागायला गेला की लोक त्याला म्हणत, ‘हिशोब लिहून घेण्यासाठी आम्हाला कोणी तज्ज्ञाची आवश्यकता नाही.’ आपल्यासारख्याला काम नाही म्हणजे काय? काम नाही तर ते निर्माण केले पाहिजे! देशातील प्रत्येक माणसाला जमाखर्च व्यवस्थित ठेवण्यासाठी तज्ज्ञ माणसाची जरूर लागेल अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी काही योजना आखली पाहिजे यासाठी तो रात्रंदिवस डोक्याला ताण देऊ लागला. हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अर्थकारण , ज्ञानरंजन , नवनीत

प्रतिक्रिया

  1. Meghsham

      6 वर्षांपूर्वी

    Nice

  2. vivek

      7 वर्षांपूर्वी

    to rule govt ,for nations development project and govt services, tax become really necessary roti kapada and makan to remove poverty govt income budjet imp

  3. natujaya

      7 वर्षांपूर्वी

    माहितीबद्दल धन्यवाद .



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen