वाईः ७० (१२५) वर्षांपूर्वी

अंक : अमृत, मार्च १९६५

लेखाबद्दल थोडेसे : आज आपल्याला वाई हे शहर मुख्यतः आठवतं ते तर्कतीर्थ लक्ष्णशास्त्री जोशी यांनी वाईतील प्राज्ञपाठशाळेतून  विश्वकोशाचा महान प्रकल्प सिद्धीस नेऊन मराठी भाषेवर करुन ठेवलेल्या अनंत उपकारांमुळे. वाईमध्ये एकेकाळी अशा  पंधरा-वीस तरी पाठशाळा नक्कीच होत्या, असे म्हणतात. अलिकडे महाबळेश्वरला लोकांचे जाणे येणे वाढल्यापासून लोक वाईलाही जाऊन येतात, कारण ‘स्वदेस’ या चित्रपटानंतर या परिसराविषयीचे आकर्षण वाढले आहे. तिसरी महत्वाची बाब आहे मेणवली येथील नाना फडणवीसांचा वाडा. वाईपासून काही किलोमिटर्सवर असलेला हा वाडा पहायलाही अनेकजण जातात. तर अशा वाई या शहरात एकेकाळी कसे धार्मिक वातावरण होते, तेथील लोकजीवन कसे होते याचा हा अतिशय रंजक असा लेखजोखा आहे. या लेखात ‘एकेकाळी’ असा उल्लेख करुन वाईचे जे वर्णन केले आहे ते सत्तर वर्षांपूर्वीचे. आता हा लेख प्रकाशीत होऊन पंचावन्न वर्षे झाली आहेत, म्हणजे या लेखातली वाई १२५ वर्षांपूर्वीची आहे. या लेखात सांगितलेले लोकजीवन आता केवळ इतिहासातच आहे, परंतु ५५ वर्षांपूर्वीच्या या वर्णनातील अनेक खाणाखुणा मात्र आजही दिसतात. हा लेख वाचताना आपल्याला काळयंत्रात बसून १२५ वर्षे मागे गेल्याचा भास होतो..

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 12 Comments

  1. gvom53@gmail.com

    खूप छान वाई डोळयासमोर उभी राहिली 👍👍

  2. mailimaye@gmail.com

    Mast !

Leave a Reply