नरकासुराची वंशावळ आणि आर्यधर्मप्रसार

पुनश्च    माधव राजवाडे    2020-09-26 06:00:54   

अंक : दीपावली, जून १९७० लेखाबद्दल थोडेसे : विष्णुपुत्र नरकासुराच्या वंशजांद्वारा इसवीसनाच्या ४ थ्या शतकापासून ते बाराव्या शतकारंभापर्यंत आर्यधर्मविस्तार कसा झाला त्याचा आणि वंशावळींचा वेध घेणारे हे विवेचन आहे.  कामरूपाच्या सीमेपासून जवळच भगवान बुद्ध जन्मले व त्यांनीही जवळच्याच मुलुखात धर्मप्रचार व प्रसार आरंभला तरीही  त्याच्या निर्वाणानंतर प्रायः १५०० वर्षे नरकवंशीय राजे बुद्धधर्मापासून अलिप्त राहिले येवढेच नव्हे तर आर्यधर्माचा व शैवपंथाचाच त्यांनी पुरस्कार केला. वर्मन,  शालस्तम्भवंशीय व पालवंशीय राजांच्या  इतिहासांचा हा वेध ताम्रपत्रांच्या आधारे घेता येतो. तरीही दिवाळीतील 'नरकासुराच्या वधाचे' कोडे सुटत नाही, असे हा पन्नास वर्षे जुना लेख सांगतो. या लेखात नरकासुराचा उल्लेख आहे, त्याच्याविषयी अधिक जाणून घ्यायची इच्छा असेल तर संजय सोनवणी यांचा https://sanjaysonawani.blogspot.com/2015/11/blog-post_10.html  हा ब्लॉग अवश्य वाचा. आर्यधर्मप्रचारक आणि विष्णूचा पुत्र असूनही नरकासुराला असूर मानण्यात त्याच्यावर अन्यायच होत आहे...तसेच दिवाळीतील नर्कचतुर्दशीशी त्याचा संबंध जोडणेही उचित नव्हे... भारत सम्राट हर्षवर्धन याची व युवानची गाठभेट गंगाकिनारी झाली. त्या भेटीत महायान बुद्धधर्माची हीनयान बुद्धांना खरी ओळख पटवून देण्यासाठी एक धार्मिक परिषद कनौज येथे बोलावण्याचे ठरले. ही परिषद इ. स. ६४३ मध्ये भरली. त्यात एकंदर १९ राजे उपस्थित होते व हजाराचे वर बौद्ध भिक्षुक. ह्या दीक्षान्त समारंभात सम्राट हर्षाने भास्कराला शैवपंथी असूनही बहुमानाचे उच्चस्थान किंबहुना निजसमार ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , माहिती

प्रतिक्रिया

  1. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    ताम्रपत्रे, शीलालेख इ.तपशीलाधारे संपूर्ण लेखन अभ्यासपूर्ण आणि ज्ञान प्रबोधक आहे. विषय मांडणी करताना लेखकाने घेतलेले कष्ट अधोरेखित होतात..म्हणून लेखक अभिनंदनाचे अधिकारी आहेत.

  2. jrpatankar

      5 वर्षांपूर्वी

    संदर्भ विस्तृत देणे आवश्यक होते.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen