कृष्णराव मराठे


अंक : वाङ्मय शोभा – सप्टेंबर १९६०

लेखाबद्दल थोडेसे : व्यक्तिचित्रणात्मक लेखनासाठी प्र. श्री. कोल्हटकर यांचे नाव का घेतले जाते हे आपल्याला हा लेख वाचून कळेल.  व्यक्तिचित्रण करताना ज्या व्यक्तिविषयी लिहायचे आहे, त्या व्यक्तीच्या प्रेमात पडायचे नाही किंवा विरोधातही भूमिका घ्यायची नाही. त्या व्यक्तीमध्ये असलेले गुण-अवगुण या दोन्हीचा परामर्ष घ्यायचा. मुख्य म्हणजे त्या व्यक्तीच्या स्वभाव वैशिष्ट्यांपासून तर शारिरीक वैशिष्ट्यांपर्यंत सर्वच पैलू त्यात रसाळपणे यायला हवेत. अश्लीलमार्तड कृष्णराव मराठे यांच्यावरील या लेखात हे सगळे गुणविशेष मौजूद आहेत.
पुणे येथे वास्तव्य असलेले कृष्णराव मराठे  महाराष्ट्र ब्राह्मणसभा, अभ्युदय मंडळ इत्यादी संस्थांचे चिटणीस होते. तसेच पुणे येथील संस्कृतिसंरक्षक मंडळाचे एक प्रमुख कार्यकर्ते होते. ते सामाजिक आणि नैतिक विषयांवर व्याख्याने देत. वाङ्मयातील अश्लीलता आणि ग्राम्य विनोद नाहीसा करण्यासाठी ते प्रचारकार्य करत. जिथे कुठे काही लैंगिक लिखाण असेल, उल्लेख असतील तिथे मराठे त्वेषाने तुटून पडायचे. यातून त्यांनी अत्र्यांसारखे बलाढ्य शत्रू, आणि कर्व्यांसारखे ऋजू शत्रू निर्माण केले. ते शेवटपर्यंत लढत राहिले. त्यांच्या या लढावू स्वभावाचे चित्रण यात अतिशय रसाळ भाषेत आले आहे. साठ वर्षांपूर्वीचा हा लेख व्यक्तिचित्रणातला अमोल ठेवा आहे.  

********

कैकृष्णराव मराठे यांच्यासारखी एखाद्या नैतिक मूल्यांसाठी जिद्दीने जिवाचे रान करणारी माणसे ही समाजाची भूषणे होतत्यांचे यथार्थ शब्दचित्र प्रश्रीकोल्हटकर यांनी लिहिलेल्या (प्रकाशन-१९४२ऋणाबंधी या पुस्तकावरून उधृत करीत आहोत.

अंगाने काटक, कमरेला पंचा, अंगांत गुंड्या असलेला किंवा नसलेला सदरा, डोक्यावर टोपी, पायांत तुटक्या वहाणा आणि डोळ्यांत कमालीचा मिस्किलपणा अशा थाटाचा उंचसा म्हातारा पुण्यांतील टिळक रोडवरील भाऊ कॉलेजच्या कोपऱ्यावर गवत विकणाऱ्या माणसाबरोबर सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास भाव ठरवितांना सांपडला, तर त्याच्या पाठीवर कृष्णराव मराठे म्हणून, आपल्या बोटांना फारशी इजा होणार नाही अशा बेताने थाप मारायला हरकत नाही. तो तुमचे स्मित-वदनाने स्वागत करील, गवताच्या महागाईबद्दल चार शब्द बोलेल आणि जवळ उभ्या असलेल्या आपल्या गाईचे दावे धरून घराकडे चालू लागेल. रस्त्यांत कोणी ओळखीचा मनुष्य भेटलाच तर ही स्वारी हसतमुखाने त्याच्याकडे पाहील आणि पुन्हा नाकासमोर चालू लागेल. याच स्वारीला उभा महाराष्ट्र ‘अश्लील मार्तंड मराठे’ म्हणून ओळखतो. दुसऱ्याची गैरसोय करण्याइतका हा गृहस्थ सनातनी नाही किंवा स्वतःची कुचंबणा करून घेण्याइतका सुधारकही नाही. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


वाड्मयशोभा
व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

  1.   4 वर्षांपूर्वी

    लेख उत्तम.. कृष्णराव मराठ्यांविषयी चांगली माहिती मिळाली.. कृष्णराव मराठ्यांचे “पराक्रम” वाचले होते.. त्यावरून हे गृहस्थ “तापट आणि चक्रम” असावेत असा माझाही ग्रह झालेला होता.. ते सोबत भिंग घेऊन फिरत असावेत असेही वाटले होते.. तथाकथित अश्लील साहित्य वाचून ह्या गृहस्थांच्या “तळपायाची आग मस्तकात” पोहोचत असेल अशीही शंका होती.. पण लेखात म्हटले आहे की “स्वारी अगदी थंड वृत्तीची असून प्रतिस्पर्ध्याशी खेळीमेळीने दोन हात करायला एका पायावर तयार असते”.. हे वाचून गंमत वाटली.. गैरसमजही दूर झाला..

  2. hemant marathe

      4 वर्षांपूर्वी

    लेखाच्या प्रस्तावनेमधे म्हटल्याप्रमाणे लेख माहीतीपूर्ण व मनोरंजक देखील आहे. त्याकाळात प्रसारमाध्यमे नसताना याप्रकारे विरोध प्रदर्शित करणे व त्यामध्ये सातत्य ठेवणे खूपच कठीण होते.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen