अंक – ललना, ऑगस्ट १९५९
लेखिका – सौ. शेजारती परमेश्र्वर
“तुम्हां हल्लींच्या मुलींना नात्याची माणसं देखील नकोशी झालीयत. मुलगी आईला विचारत नाही, भाऊ बहिणीशी तोडून वागतो, एकदां शिक्षण घेऊन नोकरीला लागला की मुलाला आईवडील डोळ्यांपुढे नकोसे होतात अन् एकदां लग्न झाल्यावर बायकोपुढे त्याला दुसरं कांही सुचेनासं होतं. सुनांना तर काय, आपण न् आपला नवरा, आपलं घर न् आपली मुलं यांच्या पलीकडे कांही दिसतच नाही. आमच्या तेव्हां नव्हतं, बाई असं!”
आईची जुनी शेजारीण माझ्याकडे बसायला, माझं घर पाह्यला आलेली असते. एवढी शिकली न् शेवटी रांधावाढायला लागली हे डोळे भरून पाह्यचं असतं तिला. मुलांच्या गराड्यांत पुस्तकांची कशी पोतेरी होत असतील हे पाह्यचं असतं. न् शेवटी “बायकांच्या जातीला नसते धंदे (म्हणजे शिक्षण!) काय कामाचे? आम्हांला नव्हती सहीसुद्धा करतां येत, पण काय राह्यालं आमचं? लग्नं झाली, मुलं झाली. कुठं काही चुकलं का?” असा शेरा मारून जायचं असतं तिला—जुन्या काळाचा न् जुन्या माणसांचा टेंभा मिरवीत. पहिल्या वर्षी पहिला मुलगा झाल्याचं, पंधरा माणसांचं धुणं-पाणी, झाडलोट अन् स्वैपाक एवढं काम हूं का चूं न करतां पंधरा वर्ष रेटल्याचं, जावेच्या सुनेचं बाळंतपण न् मुलीच्या नणंदेचं लग्न स्वतः खपून करून दिल्याचं सांगून झाल्यावर विषय निघाला. हाच नात्याची माणसं, जीव लावणं, अडचण ओळखणं, त्यांच्यासाठी खस्ता खाणं हा. अलिकडच्या मुलांना आपली माणसं कशी नकोशी झालीयत् हा.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .