बलाढ्य राष्ट्रांचे जूं मानेवर येऊन पडताच दुर्बल राष्ट्रांवर ओढवणाऱ्या अनेक आपत्तीत अत्यंत हानिकारक व दीर्घपरिणामी अशी कोणती आपत्ती असेल, तर त्या राष्ट्रांचा होणारा नैतिक अध:पात व त्याबरोबरच होणारी पौरुषहानी ही होय!
अंकित देशाचे द्रव्यशोषण करताना ज्या अनेक कुटील उपायांचे प्रबल राष्ट्रांकडून अवलंबन केले जाते त्यात त्या देशात व्यसनलोलुपता वाढवणे व तिच्या शमनार्थ लागणारी सर्व साधने आपल्या ताब्यात ठेवणे, हा एक आहे. आपला द्रव्यलोभ पुरवून घेण्याचे सुधारलेल्या राष्ट्रांचे हे सुधारलेले साधन म्हणजे त्यांच्या वर्चस्वाखाली आलेल्या राष्ट्रांच्या उरात भोसकलेला हा सोन्याचा खंजीरच होय! कारण त्यामुळे त्या दुर्दैवी राष्ट्रांचे पौरुषत्वच खच्ची होत जाते व त्यांची कधीही भरून येणार नाही इतकी दिवसेंदिवस अपरंपार हानी होत जाते आणि शेवटी ती राष्ट्रे मृत्यूपंथासच लागतात, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
याचे प्रत्यक्ष प्रत्यंतर पाहावयाचे असल्यास आम्हा हिंदी लोकांस फार दूर जावयास नको. ज्या सरकारने आमचे स्वातंत्र्य हरण केले तेच, पूर्वी हिंदुस्थानात कोणत्याही राज्यकर्त्यांकडून मिळाले नाही, इतके अमर्याद पानस्वातंत्र्य सध्या हिंदी लोकांना देण्यात किती औदार्यबुद्धि दाखवीत आहे, हे पाहून त्या गोष्टीची चांगली साक्ष पटते! इंग्रजांच्या तोफांच्या व बंदुकीच्या गोळ्यांनी गेल्या दीडशे वर्षांत हिंदुस्थानची जितकी हानी झाली नसेल, त्याच्या दसपट हानी दर साल हिंदी लोकांच्या घशाखाली उतरणाऱ्या दारूच्या प्यालांनी सध्या होत आहे!
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
SAMSON MOHITE
5 वर्षांपूर्वीसुंदर लेख