तुमच्या खर्चाचें अंदाज-पत्रक तयार करा!


अंक : किर्लोस्कर, जुलै १९६३

लेखाबद्दल थोडेसे : मध्यमवर्ग सधन झाला तो गेल्या दोन अडीच दशकांत. त्या आधी काटकसर आणि मध्यमवर्ग हे दोन समानार्थी शब्द होते. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी मुले जेंव्हा बाहेरगावी जात  तेंव्हा त्यांना घरुन महिन्याला येणाऱ्या रकमेत कसेबसे दिवस काढून शिक्षण पूर्ण करावे लागे. अनेकदा तर फावल्या वेळात चार पैसे कमावण्याचा प्रयत्नही करावा लागे. अशा परिस्थितीत त्या पिढीने निगुतीने शिक्षणाचा  संसार चालवला आणि ज्ञानसाधना केली. मात्र सर्वच विद्यार्थ्यांना हे भान नव्हते तेंव्हा स्वतःचा खर्च नियंत्रणात ठेवून शिक्षण कसे घ्यावे याबाबत या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा हा लेख आहे. १९६३ साली किर्लेोस्करमध्ये प्रकाशीत झालेला हा लेख वाचताना त्याकाळच्या मध्यमवर्गीय संवेदनांचा अंदाज आपल्याला येतो. 

********
आपल्या खर्चाचा योग्य अंदाज तुम्ही बांधाल, तर एरवी खर्चिक वाटणारे कॉलेजशिक्षण तुम्ही सहज पार पाडूं शकाल!
प्रत्येकाला खिसा चाचपल्याशिवाय भागतच नाही. ‘खिसा पाकीट सम्हालो’ अशा सूचना आगगाडी, बस आणि गर्दीची ठिकाणें या जागी मुद्दाम लावलेल्या असतात. पाकीटमार आणि खिसेकापू गफलतीच्या क्षणी आपला खिसा आणि गळा साफ कापतात. राष्ट्रपुरुषाच्या कोटाला तर प्रचंड खिसे असतात. अमेरिका, इंग्लंड, रशिया यांसारख्या प्रचंड खिशांबरोबरच, डेन्मार्क आणि स्वित्झर्लंडसारखे आंतले छोटे खिसेदेखील भारताच्या राष्ट्रपुरुषाच्या कपड्यांना आहेत. त्यांतला नया पैसादेखील सांभाळावा लागतो. उधळपट्टी, लाचलुचपत, खोटा व्यवहार, खोटी इभ्रत यांपासून आणि प्रत्यक्ष खाबूपणापासून या खिशांचे रक्षण करावे लागतें!
मग आपण तर महाविद्यालयीन वर्गातले विद्यार्थी. आपला खिसा कोणी कापलाच तर निराशा व्हायची अशी स्थिती. पण या बाहेरच्या शत्रूंपेक्षा अगदी उघडउघड वावरणारे अंतस्थ शत्रूच आपल्याला फार! कपडे, पोषाख हाच खिसा कापणारा शत्रू नंबर एक! मग खानावळी, हॉटेल्स्, चित्रपट, नाटके असे अनेक क्रमाने येतात. यांच्यापासून आपला खिसा कसा सांभाळायचा हा खरा प्रश्न आहे. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


किर्लोस्कर
शिक्षण

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen