छत्रपतींच्या पूर्वजांचा संघर्षमय इतिहास

पुनश्च    शं.गो.चट्टे    2021-01-16 06:00:02   

अंक – श्रीसरस्वती, श्रीशिवराज विशेषांक, १९६१

लेखक – शं. गो. चट्टे

लेखाबद्दल थोडेसे : इतिहासात ज्यांच्या कर्तृत्वाचा कळस आपण पाहतो, त्यांचे आयुष्य आपल्याला माहिती होते. त्यांच्या आसपासच्या लोकांचेही थोडे बहुत कळते. परंतु त्या पलिकडे जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला तर नाती-गोती, मित्रत्व-शत्रुत्व यांच्या असंख्य छोट्या मोठ्या कहाण्या असतात, आणि त्यातील प्रत्येक कथेत नाट्य खच्चून भरलेले असते. शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाबाई यांच्याविषयीही आपल्याला अशीच थोडी माहिती आहे, ती छत्रपतींच्या लोकोत्तर पराक्रमामुळे. मात्र जाधव आणि भोसले या दोन घराण्यांत आधी असलेल्या शत्रुत्वाचा इतिहास आपल्याला क्वचितच माहिती असतो. १९६१ साली प्रसिद्ध झालेल्या या लेखात तो दिलेला आहे. तो वाचत असताना एकेकाळी महाराष्ट्रातला सत्ता संघर्ष किती लहान लहान भौगोलिक तुकड्यांमध्ये विखुरलेला होता ते कळते. निष्ठा, पराक्रम, मैत्री, शत्रुत्व यांच्या अशा शेकडो कथा इतिहासात हरवूनही गेल्या असतील. आपण आज जे स्थैर्य अनुभवतो आहोत, त्याचे महत्व आणि मूल्यही हा इतिहास वाचताना लक्षात येते.

श्री. शिवरायांनी महाराष्ट्रांत स्वराज्यस्थापनेचे जे कार्य केले ते इतके अलौकिक व असामान्य होते की, त्यापुढे त्यांच्या मातृ व पितृकुळांतील कर्तबगार पूर्वजांच्या कामगिरीचा व पराक्रमाचा इतिहासकारांना सहजच विसर पडला. यामुळे या दोन्ही कुळांतील पूर्वजांच्या कामगिरीचे संकलन केलेले आढळत नाही. आज तर शिवपूर्वकालीन इतिहासाची साधने पुष्कळशी नष्ट झाली आहेत. त्यामुळे हे कार्य कठीण झाले आहे. तथापी, इतिहाससंशोधकांच्या प्रयत्नांनी जी त्रोटक माहिती उपलब्ध झाली त्यांतून ह्या दोन्ही घराण्यांतील पूर्वजांचा सुसंगत इतिहास निर्माणण करावा लागतो.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


श्रीसरस्वती , श्रीशिवराज विशेषांक , इतिहास
इतिहास

प्रतिक्रिया

  1. Diwakar Ganjare

      4 वर्षांपूर्वी

    सुंदर . . . वाचनीय . . . आवडलंय . . . धन्यवाद

  2. Hemant Marathe

      4 वर्षांपूर्वी

    खूप सविस्तर माहिती दिली आहे. धन्यवाद

  3. MANISH YENDE

      4 वर्षांपूर्वी

    Aprtim



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen