अंक :भारतसेवक, जानेवारी १९१६
“आमच्या हिंदुधर्माच्या व हिंदु समाजाच्या चाली किल्ल्यासारख्या बळकट आहेत; त्यांतल्या त्यांत आमच्या जातिभेदाची चाल तर या कडेकोट किल्ल्यांतील बालेकिल्लाच असून तो तर अभेद्यच आहे; तेव्हां असा अभेद्य किल्ला जमीनदोस्त करण्याकरीतां कंबर बांधलेल्या सभेचे प्रयत्न निष्फळ व्हावे—नव्हे त्या सभेनेच जातिभेदाचा नवा कोट आपल्या सभोवार करून आपले संरक्षण करून घ्यावे—हा आमच्या धर्माचा व चालींचा केवढा गौरव आहे; काय म्हणे जातिभेद मोडण्याकरीता परिषद भरिवली! पण त्या सभेला येवढ्या मोठ्या मुंबई शहरांतील मुठभर मंडळी हजर होती की नाही याची वानवाच, व नवा संरक्षक तट घालून होऊं घातलेले सहभोजन तर अनपेक्षित कारणाने पार पडलेच नाही; नाही तर भ्रमाचा भोपळा अधिकच फुटला असता.”
मी म्हटले, “नानासाहेब, (आम्ही शंकररावांस नानासाहेब म्हणत असूं) या का सभेच्या हकीकतीवरून व तिच्या कृतीवरून जातिभेदाचे समर्थन झाले असे का आपल्यास वाटते? आपली हकीकत अक्षरशः खरी आहे असे धरले तरी त्यावरून फार तर इतकेच निष्पन्न होते की, या सभेच्या चालकांनी व्यवस्था नीट केली नाही; आपल्या परिषदेचा जितका पुकारा करावयास पाहिजे होता तितका केला नाही; किंवा या सभेची व्यवस्थापक मंडळी व सभासद मंडळी यांमध्ये मतभेद झाला असेल; यामुळे सर्व मंडळींचा उत्साह एके ठिकाणी व एके कामी लागला नसेल; तसेच सहभोजनाच्या बाबतींत त्या चालकांना इतरांइतके धैर्य नसेल. शिवाय जातिभेद मोडण्याच्या खटपटीच्या कामांत सध्यां थोडी मंडळी हजर होती यावरून अशी खटपट करणे वाईट व जातिभेद चांगले असे कांही होत नाही. तेव्हां आपल्याला व्यक्तिविषयक किंवा संस्थाविषयक टीका पाहिजे कशास? तुम्हांला जातिभेदाचे समर्थन करावयाचे असल्यास सामान्य मुद्याने करा.”
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .