अंक : ललित, एप्रिल, १९७७
लोकप्रिय’ कादंबऱ्यांचा आता जवळ जवळ एक फॉर्म्युला ठरला आहे. एकतर ती ‘थ्रिलर’च्या रूपात अवतरते किंवा ‘वासनां’चे वासना उद्दीपित करणारे चित्र तरी रेखाटते. ‘वय वर्ष तीस’, ‘स्मगलर’, ‘सर्कस’, ‘पोरका’, ‘सायोनारा’, ‘मोनालिसा’, ‘घरंदाज भुतांच्या सहवासात’, ‘अपुरे स्वप्न’ (श्रीकांत सिनकर), ‘रिवॉर्ड’, ‘दगा’, ‘इस्टेट मॅनेजर’, ‘ज्योतिबाचा नवस’ (बाबा कदम), ‘प्रतिष्ठा’, ‘वैभव’, ‘जखम’, ‘तेथे लव्हाळे वाचती’ (चंद्रकांत काकोडकर) हे आजचे लोकप्रिय कादंबरीकार ‘वासना’ आणि ‘हिंसाचार’ याच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत. आज जीवनातील कितीतरी क्षेत्रे कादंबरीकारांना आवाहन देत आहेत. नारायण धारपांच्या ‘दिवा मालवू नका’, ‘बहुमनी’, ‘अंगारिका’, ‘कंताचा मनोरा’, ‘द्वैत आणि चक्रावळ’ या कादंबऱ्या निराळ्या जातीच्या आहेत. त्यात वैज्ञानिक सत्याचा उपयोग करून एक थ्रिलिंग जग उभे केलेले असते. त्यामुळे धारप आपल्या कादंबरीतून एक चित्तथरारक अनुभव व्यक्त करू शकतात.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Swatita Paranjape
4 वर्षांपूर्वीनाराजी प्रत्येक कादंबरीबद्दलची या काळात खूप काही घडत असताना एवढी निराशा साहित्यमद्ये असलेली पाहून मन उद्विग्न होते.
Aparna Ranade
4 वर्षांपूर्वीखुपच सुंदर आहे