भयाण वास्तवाला सामोरे जाऊन त्यातील भायनकता, दाहकता शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न दीनानाथ मनोहर ‘रोबो’मध्ये करतात. येथे सजीव होते ते सैन्यात वावरणाऱ्या डिकीचे विराट दुःख! ‘यू आर ए नॉन एन्टीटी’ या कडवट जाणिवेचा जन्म सैन्यातच होतो. माणसातले मनुष्यत्व शोषून त्याला यंत्रमानव—रोबो—बनवणारे ‘सेनादल’ पाहून आपण अस्वस्थ होतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या हुकुमांचे विचारशून्य पद्धतीने पालन करावयाचे हा मंत्र जपावा लागतो तो सेनादलात. डिकी या प्रस्थापिताच्या विराट चक्रात फसू इच्छित नाही. तो म्हणतो, “आय कॅनॉन डिस्ट्रॉय इट अण्ड बी अ पार्ट ऑफ इट.” सैन्यातल्या सगळ्याच मामसांचे एक यंत्र बनविण्याच्या प्रक्रियेचा तिरस्कार त्याला वाटतो. संवेदनाशून्य जगाचा—रोबोचा हा अनुभव म्हणजे कादंबरीकाराच्या संवेदनाशील मनाची साक्ष आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .