वानगीदाखल होनाजी बाळाच्या लावणीतल्या या पंक्ती पहा. लावण्यखनीच्या कमनीय शरीरसंपदेचे, डौलदार बांध्याचे वर्णन करताना तो म्हणतो, ‘गोल तुझ्या शरिराचा डौल, गोरा रंग, नौती कवळी। वय नूतन, हाती निऱ्या चालणे चपळ जशी नागीण गव्हाळी।’ अशा या रूपगर्वितेच्या अंगप्रत्यंगातून निथळणाऱ्या सौंदर्याने पशुपक्ष्यांवरही प्रभाव न टाकला तरच नवल! ‘ओठ शुद्ध पवळ्यांचा रंग, नासाग्र पाहून रावे रिझती। कुच संगीन परस्परे चक्रवाक पक्षी थिजती!...’ त्या सुंदरीच्या कंठातल्या माधुर्याने वृक्षांवरले कोकीळ चकित होतात; तिच्या कृश कटीची ठेवण पाहून कौतुकमिश्रित आदराने सिंह भारावून जातात अन् तिची मंदगती विशालकाय हत्तीच्या मनात सूक्ष्म असूया निर्माण करते...
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .