ऐसा योग पुन्हा येणे नाही - पूर्वार्ध


आज स्वदेशीचे आणि उद्योगधंद्यांचे अर्थ फार गढून झाले आहेत. खोटी वाढवलेली किंमत दाखवून परदेशातून कालबाह्य तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री आणावी. योग्य ठिकाणी संधान बांधून सरकारकडून स्वतःच्या उद्योगधंद्याला संरक्षण घ्यावे, आणि मग भारताच्या राखीव बाजारपेठेत आपला कमी प्रतीचा माल, आंतरराष्ट्रीय बाजारभावापेक्षा अनेक पटींनी अधिक भावाने विकून स्वदेशीच्या नावावर अमाप नफा मिळवावा, हा आज स्वदेशीचा अर्थ बनलाय. भटांनी हे अजिबात केले नाही. भारतीय तंत्रज्ञानावर, भारतीय यंत्रे वापरून व भारतीय साधनसामग्रीचा उपयोग करून बनवलेल्या वस्तू ‘मेड इन इंडिया’ ही सुवर्णमुद्रा उठवून त्यांनी जागतिक बाजारपेठेत विकल्या – हिमालयात जाऊन बर्फ विकणे जेवढे कठीण त्याहून जपानमध्ये जाऊन स्वतःची इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे विकणे कठीण! पण भट-देवधर यांनी हे केले.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

  1. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    चांगला लेख . चांगली माहिती मिळाली . वेगळ्या पद्धतीने विचार करणाऱ्या व्यक्तिमत्वाला परिचय झाला . .

  2. Ramdas Kelkar

      3 वर्षांपूर्वी

    हा लेख वाचून एका उत्तम व्यक्तिमत्वाची ओळख झाली. अशी माणसे राजकारणात गेली तर ? मला वाटते ती शक्यता कमी. असो अशी माणसे ज्यांच्या सम्पर्कात आली ती भाग्यवान. एक उत्तम परिचय करून दिल्याबद्दल लेखक श्री दत्तप्रसाद दाभोलकर ह्यांचे अभिनन्दन.

  3. Jayashree patankar

      3 वर्षांपूर्वी

    विचार परखड.भटांना नमस्कार.

  4. सुधन्वा कुलकर्णी

      3 वर्षांपूर्वी

    @हेमंत मराठेजी, डीटीपी मधील चुका वेळेअभावी शिल्लक राहिल्या होत्या. आता दुरुस्त केल्या आहेत. तरी पुन्हा वाचून जरूर कळवा. या लेखाचा उत्तरार्ध येत्या शनिवारी प्रसिद्ध होईल. प्रतिक्रियेसाठी धन्यवाद

  5. Hemant Marathe

      3 वर्षांपूर्वी

    पहिलाच लेख वाचून पुढे आणखीन वाचावेसे वाटते आहे. मात्र डिटीपी करतांना खूप चुका झाल्याचे दिसून येत आहे त्यामध्ये सुधारणा अपेक्षित आहे.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen