“बाळशास्त्री जांभेकर हे अल्पवयांत वारले. ते संस्कृत, मराठी व इंग्लिश ह्यांत निपुण होते. शिवाय त्यांना उर्दू, कानडी व गुजराथी या भाषा येत होत्या. या पश्र्चिम भरतखंडांत अर्वाचीन विद्वानांत हा एक मुकुटमणिच होता.” सदाशिव काशीनाथ छत्रे हे एल्फिन्स्टन कॉलेजांतील मुक्तसर होते. त्यांचे बाळशास्त्री हे गुरुबंधु त्यांनी यांस त्यांची तीव्रबुद्धि व चापल्या पाहून येथे आणून आपल्या घरी ठेवून त्याजकडून इंग्रजी विद्याभ्यास करविला. ह्या पुरुषाची अशी गोष्ट सांगतात की, तो एकपाठी असून त्याची धारणाशक्ति अपार होती. नेटिव्ह लोकांत इंग्रजी विद्यालयांत प्रोफेसराची योग्यता प्रथम यांसच मिळाली. ह्यांच्या अकालीन मरणामुळे मुंबईतील लोकांस फार दुःख झाले. विद्या आणि विनय हे दोन्ही गुण या गृहस्थांच्या अंगी सारखेच वसत होते.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .