भाषाशुद्धीच्या चळवळीला असंमजस, तर्कदृष्ट, अव्यवहार्य इत्यादी विशेषणांचा आहेर करून उणीपुरी दोन वर्षे झाली नाहीत तोंच ‘ज्ञानप्रकाशकार’ व राजेश्री अभे यांनी मतांतर करून धरसोड वृत्तीचे जे प्रदर्शन केले आहे ते मात्र पुष्कळांना उद्वेगजनक (व हास्यास्पदही) वाटल्यावांचून रहाणार नाही. बॅ. सावरकरांचा हा व्यक्तिप्रभाव म्हणावा की संधिसाधुपणाचा विजय समजावा? प्रो. मा. त्र्यं. पटवर्धन यांच्यातही तसाच मतपालट घडून आला आहे. आणि विशेष आश्र्चर्याची गोष्ट ही की एके काळी फार्शी शब्दांना शिरोधार्य समजणारे हे फार्शीपंडित आतां कट्टर हिंदुसंघटनावादी झाले असून शुद्धीकरणाच्या चळवळीचा उच्चैघोंष करणारे प्रवक्ते बनले आहेत.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .