वाघाचा वेग व जोर पाहाता त्याला हरणावर समोरून हला करण्यात काहीच कठीण नाही. असे असून बहुधा तो लपत छपत मागून जाऊन हरिणावर उडी घालतो हे आपण पाहतो. यांत एक फायदाही आहे. बळाचा जास्त उपयोग करावा लागत नाही. अशाच प्रकारचा फायदा शत्रूवरही हल्ला करण्यांत आहे. शत्रूवर राजरोस समोरून हल्ला करण्यापेक्षा नेहमी बाजूने एकाएकी करितात. ही युद्धनीति हल्लीही पाश्चात्य युद्धामध्ये मान्य आहे. यांत बलाचा खर्च थोडा होतो, आणि मनुष्यहानिही थोडी होते. अशा दृष्टीने हा मार्ग प्रशस्थच मानला पाहिजे, आणि मानला आहे. शिवाजीने अशा रीतीनें कित्येकदा शत्रूवर एकाएकी छापे घातले आहेत! तात्पर्य युद्धनीतीमध्ये शत्रूला फसवून मारणे हे मान्य आहे इतकेच नव्हे तर प्रशस्थही आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .