मुख्य प्रश्र्न आहे तो नाटकाचा. साठ वर्षांपूर्वीची नाटकं आजसुद्धा उभी आहेत. त्या काळच्या नटांच्या तोडीचे खंबीर आवाजाचे अभिनयकुशल नट नसले तरी आजच्या दुबळ्या नटांकडूनदेखील त्या जुन्या नाटकांचे प्रयोग सारखे होत आहेत. अत्यंत आधुनिक म्हणून जी नाटकं आज केली जात आहेत ती आधी आहेत परदेशी—ते परदेशी नाटककाराच्या ताटांतले चघळलेलं हाड देखील चारदोन प्रयोगांच्या पलीकडे जात नाही. तीच जुनी नाटकं वाऱ्यावावटळीला तोंड देऊन देखील खंबीरपणे उभी आहेत. आज नाटकांच्या प्रयोगासाठी बोटं घातली जात आहेत. पंचवीस प्रयोगांची ज्युबिली झालेली पाहिली की हंसू येतं. शंभर प्रयोग आणि दोनशे प्रयोगांचं कौतुक केलं जात आहे. जुन्या नाटकांचा असा हिशोब ठेवला असता तर त्यांचे प्रयोग हजारांनी झाले आहेत असं दिसून आलं असतं.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .