रंगभूमिः तेव्हां आणि आतां - पूर्वार्ध

पुनश्च    मामा वरेरकर    2022-06-01 10:00:02   

शेक्सपिअरची बहुप्रवेशी परंपरेनं मराठी रंगभूमीची प्रगती थांबवली. एकांकप्रवेशी नाटकाची १९२३ साली ‘तुरुंगाच्या दारांत’ या नाटकानं केलेली सुरवात परंपराप्रिय महाराष्ट्राला पचली नाही. त्यानंतर एकदोन एकांक-प्रवेशी नाटकं लिहिली गेली, पण ती फारशी कुणाच्या नजरेत भरली नाहीत. १९३१ साली ‘नाट्यमन्वंतर’नं ब्यर्नसन् या नॉर्वेजियर नाटककाराच्या नाटकाच्या अनुवादाचा प्रयोग केला. त्यांत स्त्रियांच्या भूमिका स्त्रियांनीच केल्या होत्या. त्यापूर्वी हिराबाई बडोदेकर यांच्या कंपनीत त्या तीन बहिणी काम करीत होत्या आणि त्यांच्या जोडीनं पुरुषही स्त्रीभूमिका करीत होते. ते वैगुण्य होतं. नाट्यमन्वन्तरच्या नाटकांतल्या नटी अभिनयाच्या दृष्टीनं सरस होत्या. ते नाटकही सरस होतं. नाट्यमन्वन्तरचे चालक तेवढ्याच यशावर खूष झाले आणि पाऊल पुढं टाकायला विसरले. या संस्थेचा कारभार दीड-दोन वर्षांतच आटोपला. आधुनिकतेचा पायंडा याच संस्थेनं घातला, असा समज झाला.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .अनुभव कथन

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen