“सतारीचे बोल” या सरस कवितेंत साध्या गोष्टींतून हृदयंगम चित्र रसिकांना सादर करण्याचे कौशल्य अप्रतिम आहे. कवि सतार छेडीत बसणाऱ्या खुशालचंद मामसावर प्रथम रागावला. परंतु निरनिराळ्या गती ऐकतां ऐकतां त्याचा राग, मनांतील निराशा, खेद व दुःख ही सर्व विलयास जाऊन शेवटी तो तन्मय होऊन गेला व त्याच्या मनावर शांतीचे आवरण पसरले. ‘सतार फोडुनि टाकसी न बा’ असे म्हणणाऱ्या कवीला करुणरसपूर्ण गतींतून धीर धरी रे! धीरा पोटी असतीं मोठीं फळें गोमटीं असे आशा-प्रेरक स्वर निघूं लागले असेच वाटले. सतारीचे ‘दीड दा’ ‘तम अल्प द्युति बहु’ असे शिकवूं लागले व ‘तो अखिलां भेदा विसरूनि गेला.’ त्याच्या कल्पनाचक्षूसमोर ‘स्वर्ग धरेला चुम्बायाला खली लावलों’ असे मनोहर दृश्य दिसूं लागले. शेवटी शांत गति ऐकून झोंपी गेला.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .