केशवसुतांच्या काव्याचा हा विशेष ध्यानांत घेतल्याखेरीज त्यांच्या काव्यांचा अभ्यास वाजवी रीतीने करतां येणार नाही. केशवसुतांच्या काव्यरचना कालाचे वैशिष्ट्य लक्षांत आले म्हणजे त्यांच्या कवितेत विशेष काय आहे आणि त्यांनी मराठी काव्याला कोणते वळण दिले ते सहज समजते. प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या कवितासंग्रहांत १३२ कविता आहेत. त्यांतील बऱ्याच पहिल्या प्रतीच्या उत्कृष्ट आहेत. त्यांतील अगदी कनिष्ट कविताही चांगल्या कवीच्या काव्यांत खपण्यासारख्या आहेत. म्हणजे दुय्यम प्रतीच्या काव्यांहून सरस आहेत असे त्यांच्या काव्य गुणांचे थोडक्यांत वर्णन होईल. ‘तुतारी’, ‘झपूर्झा’, ‘हरपले श्रेय’, ‘स्फूर्ति’, ‘सतारीचे बोल’, ‘गोफण’, ‘म्हातारी’, ‘वातचक्र’ या कविता त्यांच्या अत्यंत सरस काव्याचे कांही नमुने म्हणून दाखविता येतील व त्यांपैकी पहिल्या तीन कवितांना काव्यदेवीच्या मुगुटांत कोहिनूराचे स्थान मिळेल.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .