एखाद्या वंशाच्या किंवा जातीच्या इतिहासात, इतकी महत्त्वाची भूमिका, संस्कृतप्रमाणे जगातील दुसऱ्या कोणत्याही भाषेने क्वचितच बजावली असेल. संस्कृत भाषा ही सर्वोत्तम विचारांच्या आणि सर्वोत्कृष्ट वाङ्मयाच्या अभिव्यक्तीची साधन होती, इतकेच नव्हे तर भारतामध्ये राजकीय भेदाभेद असतानाही त्याची एकजूट साधण्याचे कार्य तिने केले. रामायण आणि महाभारत हे ग्रंथ, हजारो वर्षे प्रत्येक पिढीतील लक्षावधी लोकांच्या जीवनाचे भाग बनले आहेत. आम्ही भारतीय वंशाचे लोक, बुद्धाला, उपनिषदांना आणि रामायण-महाभारत यांसारख्या ग्रंथांना विसरलो, तर आमच्याजवळ शिल्लक काय राहील, असा प्रश्न माझ्यापुढे सदैव उभा राहतो. तसे झाले तर आपला हा वंश निराधार बनून जाईल आणि या प्रदीर्घ कालावधीमध्ये ज्या मूलभूत गुणांनी आपल्याला वैशिष्ट्य प्राप्त करून दिले, ते गुणही नाहीसे होतील आणि मग भारत हा भारत राहणार नाही.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .