या पुस्तकाची पृष्ठे २५१ असून ती २० प्रकरणांत विभागली गेली आहेत. श्री. दाते यांचा पुरस्कार व श्री. का.म. ताम्हनकर यांचे परिशिष्ट ही यांत सामावलेली आहेत. कै. खाडिलकरांच्या जन्मापासून त्यांच्या नाट्यलेखनाची समाप्ती होईपर्यंत सर्व घडलेल्या घटनांचा इतिहास स्वतःचे अनुभवाने श्री. लेले यांनी प्रामाणिकपणाने लिहिला आहे. आपल्याला जे मौलिक वाटते त्याच्या शुद्धतेबद्दल व खरेपणाबद्दल बुद्धि व अंतःकरण यांची साक्ष पटल्यावर कै. खाडिलकरांनी नाटक लिहून लोकजागृती केली व रसिक जनतेला करमणुकीबरोबर मार्गदर्शनाने व उत्तम विचारांचे जें देणे दिले, त्याचा सारांश थोड्याबहुत प्रमाणांत या लेखनांत आढळतो. कोणत्याही कलेची निर्मिती शुद्ध बुद्धींतून व भावनापूर्ण अंतःकरणातून झाल्यानंतर, कलावंताला त्या निर्मितीबद्दल एकप्रकारचा सात्त्विक आनंद होतो
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .