विज्ञानवाद, निसर्ग व कृत्रिम जीवन - उत्तरार्ध


प्राचीन ट्यूटन व रोमन लोक व आर्यावर्तांतील समाज यांच्या नैतिक वागणुकीचे श्रेष्ठत्व इतिहासकारांनी मान्य केले आहे. येथील लोक घरादारांना कुलपे न लावतां निर्धास्त प्रवासास जात. घटस्फोटास कायद्याने अडथळा नसतां सुमारे १५० वर्षांत घटस्फोट रोमन लोकांत आढळला नाही. इकडे बडोद्यांत घटस्फोटाचा कायदा पास झाल्यापासून प्रतिवर्षी घटस्फोटांची संख्या वाढत आहे व पुढेमागे काडीमोड करण्यास अडचण पडूं नये म्हणून व अधिक द्रव्यलाभाच्या वासनेने येथील ‘सुधारलेल्या’ स्त्रिया लग्न नोंदवून घेतात. अमेरिकेत भिन्न संस्थानांत घटस्फोटाचे नियम वेगळे असल्यामुळे जेथ सुलभ घटस्फोट मिळतो तेथे इतर संस्थानांतील स्त्रीपुरुषांची कोण झुंबड! ‘न्यायासनाचा खेळ न ठेवतां घटस्फोटा नोंदविणारे व दुःखी जोडप्यांस विरंगुळा (!) देणारे ‘आटोमॅटिक मशीन’ जर कोणी निर्माण केले तर वैवाहिक जीवन कित्ती कित्ती सुखकर होईल व व्यक्तिस्वातंत्र्याचे क्षेत्र किती वाढेल’ असे अधीर आधुनिक स्त्रिया मनांत म्हणत असतील. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



चिंतन

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen