आनंद दोन प्रकारचा असतो. पहिला स्वस्फुरित व दुसरा परस्फुरित. चित्रकार, गवई, वाद्य वाजवणारा, कोरीव काम करणारा, नर्तक वगैरे जो आनंद अनुभवितो तो पहिल्या प्रकारचा व वरील कृतींच्या दर्शन-श्रवणाने जो आनंद मिळतो तो दुसऱ्या कोटींत पडतो. यांत्रिक कारखान्यांत ठराविक साच्याचे काम ८ तास करून सायंकाळी आपल्या खुराड्यांत विश्रांतीस्तव जाणारा व कधी मद्यसेवन व हालती चित्रे, पाहून जिवास रिझविणारा आधुनिक युगांतील मजूर व प्रचीन समाजांतील दास यांची तुलना केल्यास मजूर त्यापेक्षां उन्नत ठरेल. दास चोवीस तास सेवक असला तरी त्याचा धनी आपुलकीने वागवीत असे. बेकारीचे भयंकर कष्ट त्याला सोसावे लागत नसत. त्याचे काम विविध प्रकारचे व सजीव असे. कामापासूनही आनंद मिळणे शक्य होते. कामांत कुचराई व दुर्लक्ष्य केल्यास धनी त्याला कठोर देहदंड करी; पण चांगले कृत्य केल्यास त्याला प्रेमळपणा दाखवी.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .