एकदा संसदेच्या वाचनालयातून मी काही पुस्तके वाचायला घेतली. तिथे मला श्री. अटलबिहारी वाजपेयीजी भेटले. ते भेटले की माझ्याशी मराठीत संभाषण करू लागत. त्या दिवशी ते मला हसत हसत म्हणाले, ‘वहिनी, मला मराठी भाषा येते बरं का. मला काव्य फार आवडते.’ त्यांच्या बाबतीत सर्वांत मजेदार किस्सा घडला तो राष्ट्रपतिभवनातील युनोचे सेक्रेटरी उथांट यांच्या भेटीच्या प्रसंगी. त्यांच्या सन्मानार्थ दिल्या जाणाऱ्या मेजवानीच्या वेळी मधू अटलजींबरोबर बोलत उभे होते. अटलजींची-माझी ही पहिलीच भेट. मधूंनी माझी ओळख करून दिल्यावर मी त्यांना विचारले, ‘आप की श्रीमतीजी कहां हैं?’ ते म्हणाले, ‘नही हैं.’ माझी समजूत झाली की त्या दिल्लीत नाहीत. मी त्यांना पुन्हा विचारले, ‘क्या वे दिल्लीसे बाहर हैं? कब लौटनेवाली हैं?’ त्यावर अटलजी जोर देऊन म्हणाले, ‘वो हैही नही.’
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .