म्हणून महात्माजींना काँग्रेस सोडून देणे भाग पडलें. चौदा वर्षे त्यांनी काँग्रेसची सूत्रे स्वेच्छेने चालविलीं, चौदा वर्षे ते हिंदुस्थानच्या कॉंग्रेसच्या राजकारणाचें सर्वसत्ताधिकारी होते. त्यांच्या कारकीर्दीत जनतेंत जी विलक्षण जागृति उत्पन्न झाली ती अपूर्व होय. या कालांत त्यांनी तीनदा सविनय कायदेभंग सुरू केला. पहिला अपेशी ठरला, दुसरा कांहीं अंशी यशस्वी झाला व तिसरा सपशेल फसला. युद्धप्रसंगी एखादे राष्ट्र हरलें म्हणजे दोषांचें सर्व खापर मुख्य प्रधानावर फुटते. त्याला राजीनामा देणे भाग पडते. तो लोकांच्या अनादराला पात्र होतो. ही रीत पाहून तर गांधीनी राजीनामा दिला नाहीं अशी कोणाला शंका आल्यास नवल नाहीं. तशी शंका येण्याचें कारण खचित नाहीं. कारण त्यांची लोकप्रियता पूर्वीसरखीच कायम आहे,
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .