लोकमतास न जुमानता हिंदुस्थान सरकारने ता १८ मार्च १९१९ रोजी रौलॅट कायदा झटपट पास करून घेतला व हिंदुस्थानातील भावी राजकीय अस्वस्थतेस व अनर्थपरंपरेस एक प्रकारे जन्म दिल्यासारखे होते. सनदशीर प्रतिकाराने काही अर्थ नाही असे दिसून येताच म. गांधींनी असहकाराच्या चळवळीला प्रारंभ केला. दिल्ली, अमृतसर या ठिकाणी दंगे होऊन ता. १३ एप्रिल रोजी अमृतसर येथील जालियनवाला बागेत जनरल डायरने निःशस्त्र लोकांवर तोफा डागून हिंदी लोकांची अमानुषपणे कत्तल केली. पंजाबात मार्शल लॉ सुरू होऊन अनेक लोकप्रिय पुढाऱ्यांना हद्दपार करण्यात आले.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .