साधारण सातआठ वर्षांचा असेन. ते लिहून पूर्ण झालं, एका शेजाऱ्याला वाचायला दिलं; परंतु ते परत आणण्याचीही काळजी मी घेतली नाही. घरातसुद्धा कुणी त्याबद्दल फारशी काही आस्था दाखवली नाही. म्हणजे ह्यानं काही विशेष केलंय असं काही कुणाला वाटलं नाही. मलाही तसं वाटलं नाही. नंतर पुढच्या वर्षी म्हणजे चौथीत असताना मी सानेगुरुजींची 'तीन मुले' वाचलं होतं. तेव्हा असं वाटलं होते की आपली मागील गोष्ट खूप पोरकटपणाची होती. 'तीन मुलां'वर नाटक का लिहू नये? आणि आता मला आश्चर्य वाटतं. प्रेमाच्या वगैरे भावना ज्यांना आपण फक्त प्रौढ भावना असे म्हणतो, त्या मुलांना कुठल्या ना कुठल्या स्वरूपात समजत असतात असे वाटतं. मी त्या वेळी साधारण ऐंशी पानी वही होईल एवढं नाटक 'तीन मुलां'वर लिहिलं. त्यानंतर मी लिहिणं सोडून दिलं. मग शाळेमध्ये हस्तलिखित संपादित करणं वगैरे एवढंच लिखाण झालं.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .