या लेखमालेमध्ये मराठीतील सर्वात वडील व्यंगचित्रकार हरिश्चंद्र लचके यांच्यापासून नवीन पिढीतील मंगेश तेंडुलकर यांच्यापर्यंत सात व्यंगचित्रकारांचे लेख आहेत. या सात लेखांमधून मराठी व्यंगचित्रकलेची व्याप्ती (व अर्थातच मर्यादा!) कळायला मदत होईल यात शंका नाही. लचके यांची बालबोध पण ऐतिहासिक महत्त्वाची nostalgia निर्माण करणारी चित्रे; फडणिसांची रम्य, साधी, सुगम पण मार्मिक, कौटुंबिक पण आल्हाददायक अशी चित्रे; प्रभाकर ठोकळ यांची साहित्यिक अधिष्ठान असलेली व इतर बुद्धिगम्य उपहासचित्रे; श्याम जोशींची चमकदार, मिस्किल, तिरकस चित्रे; चंद्रशेखर पत्कींची कोणताच बुरखा न घेता 'उघडी' असलेली सेक्सी चित्रे; मंगेश तेंडुलकरांच्या चमत्कृतिजन्य कल्पनेबरोबरच वरवरच्या विनोदापेक्षा खोल मानवी स्पर्शापर्यंत जाण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारी चित्रे
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .