ग्रंथांची निवड हा एक वेगळाच भाग आहे. - ती एक कला आहे, कसब आहे. उदाहरणार्थ, 'मुंग्या : तांबड्या आणि काळ्या : एक विवेचनात्मक प्रबंध' हा ग्रंथच घ्या. ग्रंथ म्हणून तो मुंग्यांच्या दृष्टीनं अत्यंत माहितीपूर्ण आणि उपयुक्त असू शकेल; कदाचित् खुद्द मुंगळ्यांनाहि त्यांत वाचनीय असं कांहीं सांपडेल, परंतु सुसंस्कृत माणसाच्या संग्रहालयांतलं पांडित्य वाढवायला त्याचा अल्पदेखील उपयोग होणार नाहीं हें उघड आहे.. तेंच, 'गागाभट्ट, एक की दोन?- एका ऐतिहासिक गल्लतीवर प्रभावी प्रकाशझोत' हा ग्रंथ या बाबतींत फार काम देईल. ग्रंथ निवडतांना, भक्कम आणि सुबक बांधणी, मोहोरेदार कागद, सुंदर छपाई, (शक्य तो) अनेकरंगी ऑफसेट मुखपृष्ठ आणि वजनदार शीर्षकांकडे खास नजर ठेवा. शीर्षकाला सोनेरी वर्ख असल्यास फारच उत्तम. अशा प्रकारें चिकित्सक आणि शोधक दृष्टीनं ग्रंथांची पद्धतशीर उसनवारी चालविल्यास लौकरच तुमच्यापाशीं एक भव्य आणि विद्वत्तापूर्ण ग्रंथसंग्रह तयार होईल.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
JAYANT PRABHUNE
2 महिन्यांपूर्वीतेंडुलकर कर पण खुसखुशीत लिहू शकायचे हे कळल