नाव नाही म्हणून प्रसिद्धी नाही आणि प्रसिद्धी नाही म्हणून नाव नाही, या दुष्ट चक्रात काही काळ व्यवस्थित गरगरत राहिलो. अखेरीस दारं ठोठावता ठोठावता दोन संपादकांना जाग आली, आणि घरात मला प्रवेश मिळाला. ते दोन संपादक म्हणजे 'मेनका'चे श्री. पु. वि. बेहेरे आणि 'वसुधा'चे वसंतकुमार सराफ. (वास्तविक हे दोघेही तसे डाराडूर झोपण्याबद्दल प्रसिद्ध. कसे काय जागे झाले कुणास ठाऊक!) या 'ब्रेकथ्रु' नंतर झपाट्याने इतर मासिकांतून माझी चित्रं येऊ लागलीत. माझी चित्रं पोस्टाने पाठवण्याऐवजी ती मी स्वतः नेऊन देतो. या निमित्ताने त्या त्या संपादकांची ओळख होते. काढलेलं चित्र त्यातल्या कुणाला आवडेल हे ठरवणं सोपं जातं.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .