त्यानंतर माझा व्यंगचित्राकडे पाहण्याचा दृष्टिकोण आमूलाग्र बदलला. व्यंगचित्र हे नुसतं दिखाऊ, सुंदर, आल्हाददायक असण्यापेक्षा ते परिणामकारक असलं पाहिजे हे मला पटले. चित्रांची मांडणी एकवेळ देखणी नसली तरी चालेल, पण विषयाचा परिणाम साधणारी असली पाहिजे व म्हणून ती प्रत्येक चित्रामध्ये विषयाप्रमाणे बदलती असली पाहिजे, हेही माझ्या लक्षात आले. चित्रांतील मांडणीबरोबरीनेच, त्यातील पात्रांच्या शरीरयष्टी, पोशाख, त्यांचे वयोमान, उभे राहण्याची बसण्याची धाटणी, काही लकबी या सर्वांचा बारकाईने विचार करून चित्रात त्याचा उपयोग केल्यास व्यंगचित्र अधिक परिणामकारक होते, असं माझ्या अनुभवाला येऊ लागले. आणि हे सर्व साधायचे तर आजुबाजूला आपण सतत डोळे उघडे ठेवून पाहिलं पाहिजे,
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .