श्री. शंकरराव हे सत्याग्रही, अहिंसावादी व विधायक कार्यावर भर देणारे आहेत; पण त्याचबरोबर ते साधनशुचितेचें महत्व व मर्यादा पाळणारे आहेत. पुढारीपण व मोठेपण लाभल्यानंतर जी सुखासीन व भोगप्रिय वृत्ति निर्माण होते तिचा वासहि त्यांच्याजवळ नाहीं. महात्माजींच्या चरित्रांत जो एक हटयोगीपणाचा प्रत्यय येतो त्याची थोडी छटा श्री. शंकररावजींच्या आचरणांत दिसून येते. हातसडीच्या तांदुळाचा भात, घरीं दळलेल्या पिठाची भाकरी, गाईचें दूध वगैरे आहाराचे नियंत्रण, पंचा-लुंगीचा पेहेराव आणि शक्यतों स्वावलंबनावर भर या गोष्टी त्यांच्या तापसी वृत्तीच्याच निदर्शक आहेत.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .