'झनक झनक पायल बाजे'च्या वेळची गोष्ट आहे. श्रेयफलकाचं (टायटल्स) गाणं “झनक झनक पायल बाजे –” या शब्दांनी सुरू करायचं ठरलं. आणि चित्रपटाचं वैभव नि त्यांत कलेचा ओज लक्षांत घेतां हें गीत एखाद्या महान् गवयी-कलाकाराच्या गळ्यांतून निघावं असं आम्हांला साहजिकच वाटलं. दरबारी रागांतील चाल मीं तयार केली. आणि गुरुवर्य अण्णांना (व्ही. शांताराम ) मी ती ऐकवली. अण्णांसकट ऐकणाऱ्या लोकांनी त्या चालीचं कौतुक केलं. आणि उस्ताद अमीरखाँ यांना तालीम देऊन मीं ध्वनिमुद्रणाची तारीख पक्की केली. खाँसाहेबांच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी नेहमींची सिनेमापद्धति मीं न अवलंबितां खानदानी बैठकीची सजावट मुद्दाम ठेवली होती.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .