पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत व्यक्ति व्यक्तीच्या संबंधाचे विशिष्ट रिवाज होते. हे असे संकेत आणि रिवाज पाळायचे म्हणजे नव्या प्रणयसंबंधांत एकीकडे कुंचबणा व्हावी, नाहीतर चोरटा व्यवहार करायची पाळी यावी, याशिवाय मार्ग नव्हता. प्रणयसंबंध उघडकीला आले तर कौलीनाची भीति; सौजन्याचा भंग होऊ दिला नाही तर फजितवाडा होऊन वर पत्नीच्या रागाशीं मुकाबला करण्याची वेळ; आणि पत्नीची उपेक्षा करायची म्हटलें तर हृदयहीनपणाचा किंवा स्त्रीलंपट असल्याचा आरोप ओढून घ्यायचा प्रसंग अशी ही परिस्थिति होती. विवाहोत्तर प्रेमसंबंध आल्यास अशी परिस्थिति केव्हाहि निर्माण होईल, तत्कालीन बहुपत्नीत्वाच्या रूढीमुळे तर ही परिस्थिति म्हणजे नित्याच्या अनुभवाची गोष्ट होती, यांत हास्यकारक असा एक भाग आहेच आणि त्यामुळे उपहासाला हा विषय मोठा छान आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .