गौतमाचा कारस्थानीपणा मोठा प्रभावी वाटतो. त्याच्या 'कामतंत्रा'मुळे सारें नाटक रंगतें. पण कारस्थानाच्या सिद्धीसाठी किती पात्रांचे हात लागले आहेत तें पाहावें. पहिल्या दोन अंकांत परिव्राजिकेने फार मोठा वाटा उचलला आहे. तिसऱ्या अंकांत बकुलावलिकेच्या कुशल प्रयत्नावर बहुतेक सारें अवलंबून आहे आणि तिच्या सफल दौत्यामुळे ही प्रेमाची गाडी नीट रुळावर आली आहे. चवथ्या अंकांत बहुतेक मुख्य मदार जयसेनेच्या सहकार्यावर आहे. त्याशिवाय, ध्रुवसिद्धि आणि कदाचित् कंचुकी किंवा राजाचा अमात्य यांनाहि या कटाची पूर्वकल्पना देणें आवश्यक वाटलें असावें. धारिणीची छोटी बहीण (किंवा कदाचित्, कन्या) वसुलक्ष्मी रंगभूमीवर कधी येत नाही; पण तिचीहि अप्रत्यक्ष मदत फार मोलाची ठरली आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .