नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर तें निष्कारणच चिघळलेलें वाटतें. कारण, परशुराम श्रीनिवासराव प्रतिनिधि हा नानांच्या कृपाछत्राखाली वाढलेला. सवाई माधवरावांवर याचें आत्यंतिक प्रेम होतें. कारंज्यावर उडी टाकून त्यांनी केलेल्या आत्महत्त्येनंतर तर हा अधिकच बेचैन झाला! आणि त्यानंतर तो कमालीचा उत्तरोत्तर प्रवाहपतित बनत चालला! नानांच्या मृत्यूनंतर पोरका बनलेला प्रतिनिधि, हा आपल्या घरगुती भांडणामुळे दिवसेंदिवस व्यसनी बनत गेला! अफू, भांग, गांजा, मद्यादि पेयांचीं व्यसनें तर तो स्वतः करीच; पण हलक्या नोकरांनासुद्धा तो ती सक्तीनें करायला लावी! तशांतून, नानांचे नोकर जे अरब-रामोशी हे लोक होते, ते त्यांनीं त्यांच्या मृत्यूनंतर स्वतःकडे नोकरीस ठेवून राबविले! अर्थात् ही गोष्ट रावबाजींना मान्य झाली नाहीं, आणि यांतूनच मग हे वासोट्याचें बंड त्यांनी निमित्तमात्र निर्माण केलें!
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .