गिधाडे - भाग दुसरा


अंक - रहस्यरंजन, दिवाळी १९६१

दररोज अठरा रुपयाच्या मिजासींत आयुष्य काढतांना बापू खुलला. जणूं सारा जन्म नोकरांच्या तळहातावर गेल्याप्रमाणें तो नोकरावर कुर्रेबाजपणे गुरकावू लागला. त्याला वाटले, साला बापू काळुस्कर तोच ! पण खिशांतील कागदाच्या भेंडोळ्यानें त्याला सौंदर्यदृष्टि आली, स्वाभिमान ताठरपणा आला! नोटेप्रमाणें साला प्रत्येक गोष्टीला वॉटर पाहिजे हेंच खरें ! हलवतांच आंत हलकेंच हिम पडत आहे असें दाखवणारा एक मोठा पेपरवेट त्यानें घेतला. लहानपणीं आपल्या मामाच्या घरीं तसला गोळा पाहिल्यापासून तसलाच पेपरवेट त्याला हवा होता. त्यानें मोठ-मोठीं लाल रसरशीत सफरचंदें घेतलीं, व त्यांत लहान मुलाच्या आवेशानें दांत रोवले. टॅक्सी करून तो मैलच्या मैल भटकला. बूट टक टक वाजवत तो मरीन ड्राइव्हवर हिंडला. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



कथा

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen