अंक - रहस्यरंजन, दिवाळी १९६१
काय करून बसलों हें त्यालाहि समजलें नाहीं, तो तिला काय सांगणार ? असल्या गोष्टी घडतात पण त्याखालीं कसली उकळी फुटून सारें उतूं जाते कुणास ठाऊक ! लहानपणी श्राद्धासाठीं बाजार करायला पैसे देऊन बापूला त्याच्या वडिलांनी दुकानाकडे पाठविलें होतें, परंतु तो परत आला तें तैलचित्रे काढण्याचें साहित्य घेऊन. रंगाच्या ट्यूब आणि ब्रश पाहून तो एकदम उकळून निघाला होता. वडिलांनी त्याला वेतानें फोडलें, त्याचेंहि त्याला विशेष वाटलें नाहीं. नंतर चारसहा दिवस वचावचा रंग थापून चार पांच सारवल्यासारखीं चित्रे काढलीं, व सारें सामान कायमचें अडगळीत पडलें.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .