दोन-तीन नाटके लिहिल्यामुळे बोडसांचा आत्मविश्वास बळावला होता. नाशिकला गेल्यावर त्यांनी मोठ्या उत्साहाने 'झांशीची राणी' हे नाटक लिहिले. हे नाटक चांगले आहे असा मित्रमंडळींनीं अभिप्राय दिल्यामुळे ते रंगभूमीवर आणावे असा विचार बोडसांनी केला. पण इंग्रजी राज्यांत 'झांशीच्या राणी'ला परवानगी मिळणे दुरापास्त होते. नाशिकच्या मॅजिस्ट्रेटनीं तें नाटक पास करायला नकार दिला. बोडस स्वभावानें हिंमती व हिकमती. त्यांचे एक स्नेही नगरला बडे सरकारी अधिकारी होते. त्यांच्या वशिल्याने 'झांशीच्या राणी'चें नांव 'शूर लक्ष्मीबाई' असें बदलून बोडसांनीं, नगरला तें नाटक पास करवून घेतलें, आणि त्याच गांवीं २३ ऑगस्ट १९३४ रोजी त्या नाटकाचा पहिला खेळ केला. हें नाटक करण्यासाठीं बोडसांनी स्वतःची 'सुंदर संगीत मंडळी' ही नाट्यसंस्था स्थापन केली.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .