सीदी व पोर्तुगीझ यांप्रमाणेंच पश्चिम किनाऱ्यावर मुम्बईस इंग्रजांचें ठाणें होतें, त्यांनाही संभाजीनें वरच्या सारखीच तंबी दिली, तेव्हां ह्या दोघांच्या भांडणांत आपण तटस्थ राहण्याचें इंग्रजांनी कबूल केले. परंतु सीदी व पोर्तुगीझ यांनी संभाजीला धुडकावून दिलें. सीदी तर खुद्द बादशहाचा नोकर होता, आणि त्याचें मुख्य ठिकाण जें जंजिरा तें, रायगडापासून नजीक असल्यामुळे संभाजीनें त्याजवर मोठ्या आवेशानें स्वारी केली; त्यामुळे सीदी नरम आला. पण पोर्तुगीझांचें सामर्थ्य व राज्य सीदीपेक्षा फारच मोठें होतें. त्यांना बादशहानें दरडावून हुकूम पाठविले की आम्ही संभाजीवर युद्ध पुकारले आहे, तर या कामी तुम्हीं सर्व प्रकारें आमचें साह्य केले पाहिजे. नाहीतर तुम्हांस हिंदुस्थानांतून साफ हांकलून देऊ.' अशीच धमकी संभाजीने सुद्धां पोर्तुगीझांना दिली; तेव्हां त्यांची मोठी चमत्कारिक अवस्था झाली.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .