१९५४-५५ साली भारतीय संघ पाकिस्तानांत गेला होता. त्या संघांत मी होतों व आमचा कर्णधार विनू मान्कड होता. भारत व पाकिस्तान ह्यांच्या राजकीय वैमनस्यामुळे दोन्ही संघाचे कर्णधार सामना हरण्यास तयार नव्हते. सामने अनिर्णित ठेवण्याचा प्रयत्न ते सारखे करीत होते. आणि तसे ते ठेवणें ही जर कर्तबगारीची गोष्ट मानली तर त्यांत ते यशस्वी झाले यांत शंकाच नाहीं. कारण पांचहि कसोटी सामने अनिर्णित राहिले. पण कर्णधारानें जर सामना जिंकण्यासाठी अविरत प्रयत्न केले नाहींत, तर त्याबद्दल त्याने ठपका घेतलाच पाहिजे. माझ्या मतें विनूनें अशी एक संधि घालवली. मी सामना जिंकूच शकणार नाहीं, अशा अपेक्षेने कुठल्याहि कर्णधारानें सामना खेळावयाला जाऊं नये.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Vivek Jiwane
2 वर्षांपूर्वीफार रोचक