मी त्या वेळी शाळेत नोकरी करत होते. दोघांच्याही नोकरीशिवाय संसार पेलता आला नसता. त्या वेळी स्त्रिया नोकरीसाठी नुकत्याच बाहेर पडू लागल्या होत्या. अविवाहित मुलीने नोकरी करणे वेगळे आणि विवाहित, घरी सासू-सासरे, दीर-नणंदा असलेल्या गृहलक्ष्मीने घराबाहेर पाऊल टाकणे वेगळे. विवाहित स्त्रीला नोकरी करताना असंख्य ताण सोसावे लागतात. एक तर तिचे बाहेर पाऊल म्हणजे आजवरच्या परंपरांना धक्का बसतो. त्या परंपरेत वावरलेल्या वडिलधाऱ्यांना असह्य होते. अपमानित वाटते. सासूला सून हाताखाली नाही याची उणीव वाटते. सून नोकरीवर जाते हा घराचा अपमान वाटतो. दिरा-नणंदांना न्यूनगंड निर्माण होतो. याच्या झळा नोकरी करणाऱ्या स्त्रीला लागतातच, पण तिच्या नवऱ्यालाही लागतात. मिंधेपणा वाटू लागतो.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .