पंडित नेहरु हे महामुत्सद्दी, थोर मनाचे व दूर दृष्टीनें सावधगिरी बाळगून राज्य करणारे गृहस्थ आहेत. एरव्ही त्यांनीं यादृष्टीनें डॉ. अंबेडकर, डॉ. मुकर्जी, श्री. नियोगी, श्री. भाभा, श्री. गोपाळस्वामी अय्यंगार, श्री. चिंतामणराव देशमुख, डॉ. राधाकृष्णन्, श्री. गिरजाशंकर वाजपेयी, श्री. चंदु लाल त्रिवेदी, श्री. जी.एल्. मेथा, श्री. मेनन वगैरे काँग्रेसशीं संबंध नसलेले अगर तुरुंगांत न गेलेले असे भिन्न प्रकृतीचे व पक्षांचे पुढारी जवळ केले, यांत त्यांचे चातुर्य व राज्यकारभाराला स्थैर्य आणणेचा आणि शांतता टिकविणेचा प्रामाणिक प्रयत्नच दिसून येतो. परंतु या त्यांच्या प्रयत्नकक्षेतून बॅ. बाबासाहेब जयकर कसे दूर राहिले हेंच समजत नाहीं.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .