सन १९२० ते १९२९ पर्यंत त्यांचा काँग्रेसशी प्रत्यक्ष संबंध होता. त्या मुदतीत त्यांनी अनेक कामें स्वार्थत्यागपूर्वक केलेली आहेत. सन १९२१ च्या असहकारितेच्या काळांत त्यांनीं काही दिवस वकिली बंदहि केली होती. जालियनवाला बाग कत्तलीच्या काही काँग्रेसच्या चौकशी कमिशनवर महात्मा गांधी व हकीम अजमखान वगैरे थोर पुढाऱ्यांचेबरोबर त्यांनी काम केलेले आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसची त्याकाळी घटना बनविण्याचे कामीं त्यांनी श्री. केळकरांचे बरोबर मोठी कामगिरी केलेली आहे. परंतु असहकारितेच्या मर्यादा वाढत जाऊन शाळा, कौन्सिलें वगैरेंवर कायमचा बहिष्कार घालण्यापर्यंत विस्तृत करण्यांत आल्या व त्यामुळे फेर-नाफेर वाद निर्माण होऊन खुद्द काँग्रेसमध्येच दोन तट पडले. महात्माजी व राजाजी हे नाफेरवादी असहकारितावादी राहिले व बॅ. दास, मोतीलालजी, जयकर, केळकर ही मंडळी कौन्सिलप्रवेशवादी व इतर बहिष्कार उठवावा अशा मताची होती. त्यातूनच पुढे स्वराज्य पक्षाचा जन्म झाला.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .