सिनेमा नट, नटी आणि तंत्रज्ञ, यांच्या मुलाखती घेण्याचे माझ्यावर "प्रसंग" आले होते. ते त्या वेळीं माझ्या डोळ्यासमोरून सरकत गेले. कोणी अर्धातास न थांबता बोलून, इतरांवर टीका करीत, तर कोणी न थांबता राजकारण सांगत, तर कोणी, जगांत आपण एकुलतेएक गुणीजन असल्याच्या खात्रीवर, आपल्या गुणांपासून व्यसनांपर्यंत, कामापासून धामापर्यंत सर्व ऐकवून, मुलाखतीच्या प्रश्नांना वेळच राहू देत नसत. योग्य, मोजकीं, सभ्य आणि सत्य उत्तरे देणारे नव्हते असें नाही, पण ती संख्या अर्थातच लहान होती.
"प्रश्न विचारणार होता ना आपण ? आपण गप्प बसलो म्हणून घड्याळ थांबते असे नाही. आपल्यालाही कामे असतील !"
वरील विचारांत या गोड आवाजाच्या प्रश्नाने फटकारल्यासारखा मी भानावर आलो.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .